Raj Thackeray : भाजप नेत्यानं अस्तित्वाचा मुद्दा काढला ; राज ठाकरेंकडून किमान शब्दात कमाल अपमान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ मे । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं होतं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झाला असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. राहुल गांधी यांचं राज ठाकरे यांनी कौतुक केलं होतं. राज ठाकरेंनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाष्य केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती. या टीकेला राज ठाकरेंनी त्यांच्या स्टाइलमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. ते कल्याणमध्ये माध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीमधील विजयाबाबत बोलताना भाजपच्या वागणुकीचा पराभव असल्याचा आरोप केला होता. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुळात पहिल्यांदा काय आहे, ज्यांची पोहोच नसते त्यांना हे सुचू शकतं. ही कोण लोकं आहेत, निवडणुका असतात त्यावेळी नाक्यावर सभा घेणारी ही लोकं आहेत, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. काही गोष्टी विरोधकांच्या असल्या तरी त्या मान्य केल्या पाहिजेत. जर तो मोठेपणा नरेंद्र मोदी दाखवू शकतात तर त्यांच्या पक्षातला खालच्या लोकांना त्या गोष्टी कळल्या पाहिजेत, असं राज ठाकरे म्हणाले.


भारत जोडो यात्रेला किती झाकायचा प्रयत्न झाला तरी कर्नाटक मध्ये त्याचा परिणाम दिसला आहे. काही गोष्टी मोठ्या मनाने मान्य केल्या पाहिजेत. त्या गोष्टी मान्य करायच्या नसतील वागा तसंच, असं राज ठाकरेंनी म्हटलं

आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारलं असता त्या नेत्यांचं अस्तित्व मुळात मोदींवर अवलंबून आहे. मोदी नसतील तर यांना खाली कोण ओळखतो, असं राज ठाकरे म्हणाले. यांच्या फारच वाटायला काही मी जात नाही ती छोटी माणसं आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी केली.राज ठाकरेंकडून मनसेच्या पक्ष संघटना बांधणीसाठी दौरे सुरु आहेत. राज ठाकरे नवी मुंबईत देखील कार्यकर्त्यांना भेटून संवाद साधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *