राज्यातील सर्व रुग्णालये फक्त दिल्लीकरांसाठी आरक्षित ; केजरीवाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवीदिल्ली – विशेष प्रतिनिधी: अजय सिंग – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील रुग्णालयं केवळ दिल्लीकरांसाठीच आरक्षित राहतील. केवळ दिल्लीकरांवरच उपचार केले जातील. हरियाणा, उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यातील नागरिकांवर दिल्लीत उपचार केले जाणार नाही. मात्र, केंद्र सरकारची रुग्णालयं सर्वांसाठी खुली राहतील.

हरियाणा आणि युपीच्या सीमा दिल्लीला चिटकून आहेत. त्यामुळे दिल्लीतील रुग्णांलयांमध्ये मोठ्या प्रमाणात येथून रुग्ण येतात. त्यामुळे दिल्लीकरांसाठी बेड उपलब्ध होणार नसल्याची भिती दिल्ली सरकारला वाटतेय. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेतलाय.

दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयं फक्त दिल्लीकरांसाठी आरक्षित असणार असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. दिल्लीकरांसाठी बेड आरक्षित ठेवण्यात येतील. इतर राज्यातील नागरिकांना ऍडमिट करुन घेतलं जाणार नाही.

इतर रुग्णांना परवानगी दिली तर ३ दिवसात सर्व बेड भरुन जातील. पाच तज्ञांच्या समितीने सल्ला दिला होता. सध्या दिल्ली सरकारकडे १० हजार बेड्स आहेत. जून अखेर १५ हजार बेड्सची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *