महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ मे । Dilip Joshi reduced 16 kg weight in one and a half month :टीव्ही मनोरंजन क्षेत्रात गेल्या दीड दशकांहून अधिक काळ ज्या मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले त्यांचे निखळ मनोरंजन केले त्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेची लोकप्रियता अजुनही कायम आहे. या मालिकेनं प्रेक्षकांना गेल्या अनेक वर्षांपासून हसवलं आहे. त्या मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षक यांचे वेगळे नातेही तयार झाल्याचे दिसून आले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमध्ये जेठालालची भूमिका करणारे प्रसिद्ध कलाकार दिलीप जोशी यांची लोकप्रियता मोठी आहे. आपल्या अभिनयानं त्यांनी चाहत्यांना जिंकून घेतले आहे. त्या मालिकेमध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण करुन जोशी हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता त्यांच्याविषयीची एक बातमी समोर आली आहे. अवघ्या दीड महिन्यात जेठालाल यांनी १६ किलो वजन कमी केलं होतं. त्यांची ती मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दिलीप यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आगामी एका चित्रपटासाठी १६ किलो वजन कमी केल्याचे सांगितले आहे. मॅशेबल इंडियामध्ये बोलताना त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. दिलीप यांनी सांगितलं की, १९९२ मध्ये हु हुंशी हुंशीलालची भूमिकेसाठी त्यांना वजन कमी करण्याचे आवाहन स्विकारावे लागले होते. मी ज्याठिकाणी काम करत होतो तिथून घरी पायी जायचो. याशिवाय मी स्विमिंगही करत होतो. याचा फायदा मला झाला.