महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ मे । यावर्षीचा उन्हाळा महाराष्ट्रभराला बेजार करत आहे. त्यातल्या-त्यात पुणे-मुंबई सारखी महत्त्वाची शहरे यात होरपळून निघत आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही उन्हाचा तडाखा जाणवत आहे.आज पुणे शहराचे हवामान कसे होते ? आजचा उन्हाचा तडाखा जास्त होता की कमी होता? दिवसाचे किमान आणि कमाल तापमान किती होते ? हवा किती शुद्ध होती? याच संदर्भात भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
पुण्याचे आजचे किमान तापमान 21.3 अंश,सेल्सियस होते तर कमाल तापमान 38.5 अंश सेल्सियस एवढे होते.बुधवारी 17 मे रोजी पुण्यात आकाश हे निरभ्र होते. मागील काही दिवसांच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसारस पुण्यात गेल्या आठवड्याभरापासून तापमान 38 अंश ते 40 अंश सेल्यियसमध्ये आहे .उन्हाचा पार वाढत असल्यामुळे महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.