महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ मे । इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये, आज लीग टप्प्यातील 65 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात खेळवला जाईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. या मोसमात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत.
पॉइंट टेबलमध्ये हैदराबाद नवव्या स्थानावर आहे
हैदराबादने या मोसमात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी केवळ चार सामने जिंकले आणि आठ सामने गमावले. दहा संघांच्या गुणतालिकेत संघ आठ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. बेंगळुरूविरुद्ध, संघाचे 4 परदेशी खेळाडू एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन आणि फजल हक फारुकी असू शकतात. याशिवाय मयंक मार्कंडे, राहुल त्रिपाठी आणि टी नटराजन हे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत, पण संघाला विजय मिळवून देऊ शकलेले नाहीत.
बेंगळुरू संघाने 12 पैकी सहा सामने जिंकले
या मोसमात बेंगळुरूने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने सहा जिंकले आणि तेवढेच सामने गमावले. संघाचे 12 गुण आहेत. फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल आणि वेन पारनेल हे हैदराबादविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल हे खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत.
हैदराबाद बंगळुरू टीमवर भारी
हेड टू हेडबद्दल बोलायचे झाले. तर हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यात आतापर्यंत एकूण 22 सामने झाले आहेत. त्यापैकी 12 सामने हैदराबादने तर 9 सामने बंगळुरूने जिंकले आहेत. आणि एका सामन्याचा निकाल अनिर्णित होता.
खेळपट्टी अहवाल
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी संथ आहे. या मैदानावर फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र, मध्येच काही वेळ घालवल्यानंतर फलंदाजाला खेळपट्टीवर धावा काढणे सोपे जाते.
हवामान स्थिती
गुरुवारी, 18 मे रोजी हैदराबादचे हवामान बहुतांशी स्वच्छ राहील. दिवसाचे तापमान 26 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. ढगाळ वातावरण असेल, पण पावसाची शक्यता नाही.
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद :
एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, फजल हक फारुकी आणि टी नटराजन.
इम्पॅक्टफूल खेळाडू :
अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, अकिल हुसेन, मयंक डागर, नितीश रेड्डी.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर :
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.
इम्पॅक्टफूल प्लेयर : विजयकुमार वैशाख, फिन ऍलन, शाहबाज अहमद, हिमांशू शर्मा, सुयश प्रभुदेसाई.