महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – भोकर नगर परिषद अंतर्गत शहरातील घन कचरा उचलणारे गुत्तेदार यशवंत ग्यानोबा प्रधान यांना माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी दि.५ जून रोजी दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान भोकर नगर परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ अडऊन घनकचरा उचलण्याच्या ठेक्यापोटी १ लाख ५० हजार रुपये ३ दिवसात द्यावेत व प्रतिमाह ५० हजार रुपये द्यावे ,अन्यथा ठेका मिळू देणार नाही.म्हणून पैशाची मागणी करुन जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद यशवंत प्रधान यांनी दिल्यावरुन माजी नगरसेवक केशव मुद्देवाड विरुद्ध भोकर पोलीसात खंडणी मागल्याचा व जातीवाचक शिवीगाळ केल्याने अनुसूचित जाती जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायदा(अॅट्रॉसिटी अॅक्ट) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तर भोकर नागर परिषेदेचे कार्यालयिन कर्मचारी साहेबराव मोरे यांना एका कामाविषयी माहिती अधिकारानुसार माहिती मागीतलेली का देत नाहीस म्हणून माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी दि.५ जून रोजी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान नगर परिषद कार्यालयात वाद घातला. धक्काबुक्की करुन जातीवाचक शिवीगाळ केली.अशी फिर्याद साहेबराव मोरे यांनी दिल्यावरुन भोकर पोलीसात केशव मुद्देवाड यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायदा(अॅट्रॉसिटी अॅक्ट) नुसार व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील दोन गुन्हे प्रकरणी केशव मुद्देवाड यांना भोकर पोलीसांनी दि.५ जून रोजी अटक केली आणि दि.६ जून रोजी भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले.यावेळी सरकारी वकील व आरोपींचे वकिल यांच्यात युक्तिवाद झाला.या दरम्यान केशव मुद्देवाड यांनी मा. न्यायालयापुढे सांगीतले की,मला पायी मा. न्यायालयात पोलीस घेऊन येत असतांना फिर्यादीच्या हस्तकाकडून नाहक त्रास देण्यात आला व मा. न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर यांनी त्यांच्या काही सहका-यांसमवेत येऊन जीवे मारण्याची धमकी दिली.केशव मुद्देवाड व दोन्ही बाजूंचे वकील यांचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर उपरोक्त दोन्ही गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी जिल्हा न्यायधीश मा.मुजीब एस.शेख यांनी केशव मुद्देवाड यांना दि.९ जून पर्यंत ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.तर पुढील अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी.मुदिराज हे करत आहेत.