महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – राज्यामध्ये सर्वांनाच मान्सूनचे कधी आगमन होणार, याची प्रतिक्षा लागली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने नऊ ते ११ जून दरम्यान सहा राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढच्या ४८ तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
या कमी दाबाच्या पट्टयामुळ ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र (विदर्भ) या भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.