महाराष्ट्र 24 ऑनलाईन – नांदेड : विशेष जिल्हा प्रतिनिधी :संजीवकुमार गायकवाड
तर ग्राम पंचायत कार्यालय बेटमोगरा च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोणा रुग्णांसाठी लागणारे साहित्य वाटप, व महिला बालकल्याण विभाग (जि.प.) कडून गरोदर मातांना बेबीकीट वाटप करण्यात आले.
तसेच आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.
मुखेड तालुक्याचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व जिल्हा परिषद नांदेड चे माजी अध्यक्ष मा.दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचे मोठे बंधू कै.नागोराव पाटील बेटमोगरेकर यांचा आज दि.८ जून रोजी १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त बेटमोगरा येथील त्यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाला सकाळी ११ वा. सुरुवात झाली.
सर्वप्रथम कै.नागोराव पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रतिमेला त्यांचे चिरंजीव विजय नागोराव पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तद्नंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार मा.अमर राजूरकर, मा.संजय बेळगे (शिक्षण बांधकाम सभापती), मा.अॅड.रामराव नाईक,(समाजकल्याण सभापती), माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व सौ.सुशिलाताई हणमंतराव पाटील (महिला बालकल्याण सभापती), मा.दिलीप पाटील बेटमोगरेकर (माजी जि.प.अध्यक्ष), शिवाजी पाटील पाचपिपळीकर (ता.काँग्रेस अध्यक्ष) सरपंच सौ. पद्मजा खुशालराव पाटील आदींसह तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी कै.नागोराव पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगा मध्ये कोरोना व्हायरस (कोव्हीड-१९), या महाभयंकर संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून दि २२ मार्च च्या जनता कर्फ्यु नंतर देशात सर्वत्र लॉकडाऊन चे आदेश सरकारने दिले आहेत.तसेच देशात सर्वत्र कलम १४४ (जमाव बंदी) कायदा लागू करण्यात आला आहे. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सोशल चा वापर करून कै.नागोराव पाटील यांच्या पुण्यिथीनिमित्त महिला बालकल्याण विभाग (जि.प. नांदेड) च्या वतीने सौ.सुशिलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या वतीने आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते गरोदर मातांना भगिनींना बेबी कीट चे वाटप करण्यात आले. तर ग्राम पंचायत कार्यालय बेटमोगरा यांनी १४ व्या वित्त आयोग निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रास खास कोरोना रुग्णांनसाठी आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते
साहित्य वाटप केले. त्याचबरोबर येथील बचत भवन मध्ये आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला एन.एस.यु.आय शहराध्यक्ष विशाल गायकवाड, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष माधव देवकत्ते, वैजनाथ पाटील, सरपंच प्र. खुशाल जी पाटील,महाजन ढेकळे, सुरेश नवलेकर, इमाम कुरेशी,संतोष अमृतवाड,शिवा पाटील बाऱ्हाळे,मष्णा देशाई,प्रल्हाद यरपलवाड, माधव कांबळे,बालाजी पोतदार आदींची उपस्थिती होती.