महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाडन :दि.8 – काँग्रेसचे जेष्ठनेते राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री मा.ना.अशोक चव्हाण यांनी आता कोरोनावर मात केली असून सध्या ते मुंबईतील आपल्या निवासस्थानी क्वारंटाइन आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर अशोक चव्हाण यांना नांदेड येथून मुंबईला आणून लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णवाहिकेतून ११ ते १२ तास प्रवास करत त्यांना मुंबईला हलवण्यात आलं. यानंतर नांदेडमध्ये उपचारासाठी चांगली रुग्णालयं नाहीत का ? असा प्रश्न विरोधकान कडून विचारला जात होता. यावर अशोक चव्हाण यांनी आता उत्तर दिलं असून या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, हे प्रश्न उपस्थित करणारी फक्त एकच व्यक्ती असून . राजकरणातील पातळी अत्यंत खालच्या स्तरावर गेली आहे. कशा पद्धतीने प्रसिद्धी मिळवता येईल याचाच हा भाग असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं . पुढे ते म्हणाले, मला नांदेडमधील विरोधी आणि इतर पक्षांनीही शुभेच्छा दिल्या. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मला फोन करुन शुभेच्छा दिल्या. पण एक-दोन लोक असतात ज्यांना प्रसिद्धी हवी असते,” त्यामुळे ते अशी टीका करत असतात असं चव्हाण म्हणाले.
तर पुढे बोलताना ते म्हणाले, “कोणी कुठे उपचार घ्यावेत हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझं सर्व आयुष्य मुंबईत गेलं. शिक्षण मुंबईत झालं. मुंबईशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. तर नांदेड माझं जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. तेथील लोकांनी प्रेम दिलं. पण माझे डॉक्टर कुठे आहेत, कुठे उपचार घ्यावेत हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर कोणाला आक्षेप घेण्याचा अधिकार नाही. लोक अमेरिकेला, लंडनला उपचार तसंच शिक्षण घेण्यासाठी जातात. याचा अर्थ नांदेडमध्ये चांगले डॉक्टर, शिक्षण नाही असं होत नाही. लवकर बरं होणं जास्त महत्त्वाचं आहे,” असं अशोकराव चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तर कोरोना झाल्यावर नेमकी काय मनस्थिती होती याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “प्रत्यक्षात आजार झाल्यावर जी मानसिकता असते तशीच माझी स्थिती झाली होती. भीतीचं वातावरण होतं. रुग्णालयात गेल्यानंतर जेव्हा संपूर्ण रुग्णालयच कोरोनासाठी राखीव असतं तेव्हा बाजूच्याचा संसर्ग होऊ नये अशी भीती वाटत होती. सुरुवातीचे एक-दोन दिवस चिंतेत गेले. विषय संपेल की वाढेल अशी भीती वाटत होती. पण योग्य उपचार झाल्याने वेळेवर बरा झालो. अस चव्हाण यांनी सांगितलं .
तर पुढे बोलताना ते म्हणाले, लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मी नांदेड जिल्ह्यातच होतो. लोकांना मदत करण्याचं काम सुरु होतं. स्थानिक पातळीवरचं काम करण्यासाठी पुढाकार घेत होतो. त्यांनतर मुंबईत विधानपरिषद निवडणुकीसाठी आलो होतो. निवडणूक बिनविरोध झाल्याने लगेचच परत आलो होतो. पण रेड झोनमधून नांदेडला गेल्याने पूर्वकाळजी म्हणून मी घरीच क्वारंटाउन झालो होतो. पण पाचव्या दिवशी एक्स-रे काढला तेव्हा कोरोनाची लक्षणं नजर आली. पण वेळेवर निदान झालं ही सुदैवाची गोष्ट असल्याचं चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं .