अवघ्या पाच हजारांच्या तिकिटांमध्ये तीन देशांचा प्रवास

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मे । ‘अराऊंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स’सारखे जुने चित्रपट किंवा पुस्तके अनेकांना आठवत असतील. सध्याही कमीत कमी खर्चात जगप्रवास करणारे अनेक लोक आहेत. आता एका तरुणीने अवघ्या 50 डॉलर्स म्हणजेच सुमारे 5 हजार रुपयांच्या तिकिटांमध्ये तीन देशांचा प्रवास केला आहे. इतकेच नव्हे तर अन्य पर्यटकांनीही आपल्या खर्चाचा ताळमेळ घालावा यासाठी आपण केलेल्या खर्चाचा हिशेब तिने शेअर केला आहे.

या तरुणीचे नाव आहे सबीना त्रोजानोवा. 29 वर्षांची सबीना 9 मे रोजी लंडनहून आयर्लंडच्या डबलिन येथे 1300 रुपयांच्या फ्लाईट तिकिटाने गेली. त्यानंतर दोन दिवस डबलिनमध्ये राहिल्यावर ती फ्रान्समधील मार्सैय शहरात 1700 रुपयांच्या फ्लाईट तिकिटाने गेली. याठिकाणी फिरल्यानंतर सबीनाने स्पेनच्या पामा येथे जाण्यासाठी 1600 रुपयांचे फ्लाईटचे तिकीट बुक केले. सबीनाला तीन देशांमध्ये फिरण्यासाठी फ्लाईट, राहण्याचा खर्च, जेवण हे सगळे मिळून एकूण 63 हजार रुपये खर्च आला.

तीन देशांच्या प्रवासाच्या तुलनेत हा खर्च कमी आहे. पूर्व लंडनमधील कंटेंट क्रिएटर असलेल्या सबीनाने सांगितले, मला अनेकांनी सांगितले की त्यांना प्रवास करायचा आहे; पण खर्च परवडत नाही. हेच लक्षात घेऊन मी नवीन देशात सर्वात स्वस्त फ्लाईट शोधण्यासाठी निघाले. मला ते एकटीलाच करायचे होते. माझे पुढचे ठिकाण शोधण्यासाठी मी आदल्या रात्री फ्लाईट बुक करीत असे. मी शहरांमधून पायी फिरले. एका अ‍ॅपच्या माध्यमातून स्वस्त तिकिटे खरेदी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *