यंदापासून ‘एक राज्य, एक गणवेश योजना’:3 दिवस शाळेचा, 3 दिवस सरकारी गणवेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मे । यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) राज्यातील २५ हजार सरकारी शाळांतील ६४ लाख २८ हजार विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश असेल. सरकारच्या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर काही शाळांनी दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजनेचा आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, शाळेने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस परिधान करतील. तर सरकारने ठरवून दिलेला गणवेश हा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस परिधान करतील. विद्यार्थ्यांना सरकार बूट आणि मोजेही देणार आहोत. आमचा निर्णय शासकीय शाळांसाठी आहे. खासगी शाळांतील मुलांनाही सरकारकडून गणवेश देण्याचा मानस आहे. एक गणवेश करण्यामागे शिस्त ल यासाठी वर्षाला ३८५ कोटीचा खर्च येईल, त्याचे कंत्राट निघणार आहे.

मुला-मुलींना आकाशी शर्ट अन् गडद निळी पँट, स्कर्ट आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट असा हा गणवेश असेल. मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. जर शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची आणि कमीज आकाशी रंगाची असेल. मुलांना सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली पाहिजे, या भावनेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा गणवेश हा स्काऊट गाइडशी साधर्म्य साधणारा असेल, असेही केसरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *