NA Permission : असेल फक्त ‘हा’ परवाना तर NA ची ही गरज नाही; बांधा स्पप्नातलं घरं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ मे । बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून यामुळे अनेकांच्या स्वप्नातील घराचे चित्र आता पुर्णत्वास जाणार आहे. बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडांवर अकृषिक परवानगीची गरज आला लागणार नाही. म्हणजेत बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर NA परवानगीची गरज लागणार नाही. त्यामुळे फक्त NA परवाना नसल्याने रखडलेल्या घरांचे काम आता पुन्हा सुरू होणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 मधील तरतुदी अन्वये सक्षम प्राधिकाच्याकडून एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात येत असताना अशा जमिनीमध्ये NA परवाना असल्याची खात्री केली जाते. त्यानंतर त्या जमिनीवर बांधकाम करता येत होते. मात्र आता महाराष्ट्र जमीन संहिता, 1966 च्या कलम 42-अ, 42-ब 42-क, 42 ड किंवा 44 अ अन्वये स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *