Monsoon Update: पुढच्या महिन्यात पाऊस सर्वसाधारणच ! हवामान विभागाचा अंदाज काय ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ मे । या वर्षाच्या हंगामात मान्सून सर्वसाधारण असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने नैर्ऋत्य मान्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केला आहे. जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के पर्जन्यमान अपेक्षित असल्याचं हवामान विभागाने म्हंटलं आहे.

भारतात सर्वसाधारण पाऊस होणार आहे. मात्र जून महिन्यात मात्र पाऊस कमी असु शकतो. जूनमध्ये दक्षिण भारतातील काही भाग, वायव्य भारत, अतिउत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भाग जिथे सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे, ते वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागाने म्हंटलं आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जून महिन्यात कमी पावसांची शक्यता आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहणार असल्याचा हवामान खात्याने वर्तवला आहे.

मोसमी पावसाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार देशभरात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीइतका पाऊस पडेल, तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी असंही म्हंटलं आहे. जूनमध्ये देशात आणि राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असुन जूनमधील किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *