बीड ; जिल्ह्यात आज सहा पॉझिटिव्ह; ३५ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी :संजीवकुमार गायकवाड :- बीड :९- * जिल्ह्यात आज कोरोनाचा दुसरा बळी गेला. मुंबईहून परतलेल्या आष्टी तालुक्यातील ३५ वर्षीय तरुणाचा दोन वेळा घेतलेला स्वॅब‌ अनिर्णीत आला होता. रविवारी तिसऱ्यांदा त्याचा स्वॅब‌ घेतल्यानंतर त्याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला होता. या तरुणाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. तसेच, अन्य पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सहाची भर पडली. सोमवारी जिल्ह्यातील २२ व्यक्तींचे स्वॅब अंबाजोगाईच्या नव्या प्रयोगशाळेत आणि लातूरच्या वैद्यकीय विज्ञान संस्थेत तपासणीला पाठविण्यात आले होते. त्यातील १५ अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित ०१ अहवाल अनिर्णयीत आहे तर ०६ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले.

आष्टी तालुक्यातील मातावळी येथील एक कुटूंब ३१ मे रोजी मुंबईहून गावी आले होते. याच कुटूंबाचा एका पॉझिटिव्ह रुग्णासोबत संपर्क आला होता. गावी येताच आरोग्य विभागाने त्यांना जिल्हा रुग्णालयात आणून स्वॅब घेतला. पत्नी दोन मुले व मयत व्यक्ती यांचा स्वॅब घेतला. या तिघांचेही स्वॅब निगेटिव्ह आले तर पुरूषाचा अनिर्णीत आला होता. पुन्हा ४८ तासांनी स्वॅब घेतला. त्याचा अहवाल देखील अनिर्णीत आला. रविवारी रात्रीही स्वॅब घेतला. परंतू पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला. यात तो पॉझिटिव्ह असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. हा जिल्ह्यातील दुसरा बळी ठरला आहे. यापूर्वी आष्टी तालुक्यातीलच सांगवी पाटण येथे आलेले परंतू मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ६५ वर्षीच वृद्धेचा मृत्यू झाला होता.

तसेच, धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील दुसर्‍यांदा पाठवण्यात आलेल्या दोन पैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच ठाणे येथून परतलेली मालेगाव बुद्रुक (ता.गेवराई) येथील १८ वर्षीय मुलगी, हैदराबादहून बीडला परतलेले मसरतनगरमधील ०३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आंबेवडगाव येथील ६५ वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर दुसर्‍या दिवशी सदरील इसमाच्या दोन सुनांनाही लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. याच कुटुंबातील दुसर्‍यांदा पाठवलेल्या दोन पैकी एकाचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे.यामुळे आंबेवडगावच्या बाधित रुग्णांची संख्या चार झाली आहे.

*मालेगाव (बु.) येथे कंटेनमेंट झोन जाहीर :*
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर गेवराई तालुक्यातील मालेगाव (बु.) येथ कंटेनमेंट झोन घोषित करून हा परिसर अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *