देशाला मिळाले आजवरचे सर्वाधिक किमतीचे अन् मोठे नाणे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ मे । नूतन संसदेच्या लोकार्पणाचा दिवस कायम संस्मरणीय राहावा म्हणून विशेष टपाल तिकीट आणि 75 रुपयांच्या नाण्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

75 च्या या नाण्याची खासियत काय?

* केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून जारी राजपत्र अधिसूचनेनुसार, नाण्याचे वजन 34.65 ते 35.35 ग्रॅम आहे.

* नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी अशोक स्तंभाचा सिंह आहे. तर, डावीकडे देवनागरी लिपीत भारत लिहिलेले आहे. उजवीकडे इंग्रजीत इंडिया लिहिलेले आहे.

* अशोक स्तंभाच्या सिंहाखाली रुपयाचे चिन्ह असून 75 असे अंकात लिहिलेले आहे. या नाण्याचा व्यास 44 मि.मी. असून, हे नाणे चार धातूंच्या मिश्रणाने तयार केले आहे.

* 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के जस्त या नाण्यात आहे. हे नाणे कोलकाता टांकसाळीत तयार झाले आहे.

* नाण्याच्या दुसर्‍या बाजूला संसदेचे चित्र तर वरच्या बाजूला देवनागरीत तर खालच्या बाजूला इंग्रजीत संसद संकुल असे लिहिलेले आहे. खाली 2023 हे वर्ष नमूद आहे.

* 75 रुपयांचे नाणे हे आजवरचे सर्वांत मोठे आणि महागडे नाणे आहे. हे नाणे हाती येताच प्रत्येकाच्या मनात नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या आठवणी चाळवल्या जातील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *