धोनीसह हे दिग्गज निवृत्तीच्या वाटेवर ? 100 कसोटी खेळलेल्या क्रिकेटपटूचा समावेश

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ मे । चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अंबाती रायुडूने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. चेन्नई सुपर किंग्जशिवाय तो मुंबई इंडियन्सच्या चॅम्पियन संघातही होता. आतापर्यंत १४ हंगामात तो ५ वेळा आयपीएल विजेत्या संघाचा भाग होता.

अंबाती रायुडूच्या आयपीएल निवृत्तीनंतर आणखी काही खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा होत आहे. यात महेंद्र सिंह धोनी, दिनेश कार्तिक यांच्या नावांचा समावेश आहे.

दिनेश कार्तिक – 2022 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड पकनंतर यंदाचे आयपीएलसुद्धा दिनेश कार्तिकसाठी समाधानकारक नव्हते. त्याला 13 सामन्यात 140 धावाच करता आल्या आहेत. 2008 पासून तो आयपीएलमध्ये सहभागी होत असून यंदा त्याची सर्वात खराब कामगिरी झालीय.

इशांत शर्मा – 2021 नंतर त्याला यंदा आय़पीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालीय. दिल्ली कॅपिटल्सकडून इशांत 8 सामन्यात खेळला. यात त्याने 10 विकेट घेतला. आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने 101 सामन्यात 83 विकेट घेतल्या आहेत. तो 100 कसोटी खेळणाऱ्या मोजक्या भारतीयांपैकी एक आहे.

अमित मिश्रा – लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा ४० वर्षीय अमित मिश्रा यंदा 7 सामन्यात 7 विकेट घेऊ शकला. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर हॅट्ट्रिकही आहे. 161 आयपीएल सामने खेळलेल्या अमित मिश्राने 173 विकेट घेतल्या आहेत.

एमएस धोनी – यंदाचे आयपीएल धोनीचे शेवटचे असू शकते. पुढच्या हंगामात मी खेळेन की नाही हे माहिती नाही असं त्याने याआधी म्हटलं होतं. 2008 पासून आयपीएलमध्ये खेळणारा धोनी सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने चेन्नईला चार वेळा विजेतेपद मिळवून दिलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *