देवी सप्तशृंगी मंदिरात ड्रेसकाेड प्रस्तावित, सर्वानुमते निर्णय घेण्याची विश्वस्त मंडळाकडून सूचना

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ मे । साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तश्रृंगी देवी मंिदराचे पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विश्वस्त मंडळाने मंदिर फेडरेशनच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी हा निर्णय घेण्यापूर्वी विश्वस्त संस्थेच्या संयुक्त सभेत धार्मिक परंपरेनुसार आणि विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ, भाविकांना विश्वासात घेवून सर्वानुमते निर्णय घ्यावा, अशी सूचना मांडली आहे. राज्यात नागपूर, पुणे, तुळजापूर येथील प्रख्यात मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याचा मुद्दा चर्चेत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता सप्तश्रृंग मंदिरातील निर्णयाकडे लक्ष लागून आहे.

तुळजाभवानी देवी मंदिरात महिला, मुलींसह पुरूषांनाही हाफ पॅण्ट, जीन्स, कमी कपडे परिधान करणाऱ्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. मात्र त्यावरून वाद झाला. भाविकांसह विविध संघटनांनी उघडपणे केलेल्या विराेधाची दखल घेत ट्रस्टला तातडीने निर्णय मागे घ्यावा लागला. सप्तश्रंृगीमंदिरातही दर्शनासाठी वर्षभर देशभरातून लाखाेंच्या संख्येन भाविक येतात. अनेक महिला, मुली पारंपरिक वेशभूषेएेवजी जीन्स, हाफ पॅण्ट अशा वस्त्रप्रावणांचा वापर करतात. ते टाळण्यासाठी सप्तशृंग विश्वस्त संस्थानकडून ड्रेसकाेडचा विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *