गौतमीने पाटील आडनाव लावावं का? संभाजीराजे म्हणाले …….

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ मे । गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव लावू नये अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात आली होती. संघटनांच्या या मागणीनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. संघटनांच्या या मागणीनंतर अनेकांकडून टीका करण्यात आली होती. आता खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी आपले गुण व कतृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोक सुद्धा पाटील आडनाव लावतात, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे?
महिलांनी आपले गुण व कतृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोक सुद्धा पाटील आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे. कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

संसद भवनावर प्रतिक्रिया
दरम्यान रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्य संसद भवनाचं उद्घाटन झालं. विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. यावरही छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी संसद भवनाचं उद्घाटन केलं. मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रपती असते तर या कार्यक्रमाची गरिमा आणखी वाढली असती असं त्यांनी म्हटलं आहे.

ईडीवर प्रतिक्रिया
ईडीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की मी ईडीला घाबरतो का? तर मी ईडीला घाबरत नाही. कारण मी आयुष्यात असं कोणतंही चुकीचं काम केलेलं नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *