निगडी येथील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी बिट निरिक्षक तसेच फ क्षेत्रिय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी-सारीका काळभोर-चव्हाण

Spread the love

Loading

पिंपरी।
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच अनधिकृत बाधकामांवर कारवाई करण्याचे आदेश खुद्द महापालिका प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेले असताना निगडी येथे राजरोसपणे बेकायदेशिर बांधकाम सुरू आहेत. ही गंभीर बाब महापालिका फ क्षेत्रिय अधिकारी, बिट निरिक्षक तसेच महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनकडे वेळोवेळी तक्रार केलेली असतानाही  महापालिका अधिकारी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा बेकायदेशीर बांधकामांना पाठिशी घालणारे तसेच पाठबळ देणाऱ्या फ क्षेत्रिय अधिकारी सीताराम भवरे तसेच बांधकाम विभागाच्या बिट निरिक्षकांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सारीकाताई काळभोर-चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात सारीका चव्हाण यांनी म्हटले आहे की, फ क्षेत्रिय अधिकारी सिताराम भवरे तसेच बिट निरिक्षक यांच्या विरोधात बेकादेशीर बांधकाम प्रकरणी निलंबन कारवाई करण्यात यावी. निगडी येथील मारुती मंदिराच्या पाठीमागे राजरोसपणे बेकादेशीर बांधकाम सुरू असून, त्या संदर्भात एक महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन व फ क्षेत्रिय कार्यालय तसेच सारथी हेल्पलाईनकडे रितसर तत्रकार करण्यात आलेली आहे. मात्र आर्थिक हितसंबंध असल्याकारणाने फ क्षेत्रिय अधिकारी कारवाई करण्यास सोयीस्करपणे कानाडोळा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *