Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Weather Update: राज्यातील या भागांमध्ये आज पावसाची शक्यता - Maharashtra 24

Weather Update: राज्यातील या भागांमध्ये आज पावसाची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मे । राज्यातील काही ठिकाणी तापमानात काही प्रमाणत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही उकाड्याने नागरिकांना हैराण केलं आहे.राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊसही हजेरी लावत आहे. अशातच आता आजही काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.तर, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर 1 जून रोजी दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामानाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यावेळी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आकाश निरभ्र राहून सूर्यप्रकाशाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *