रिझर्व्ह बँकेचा अहवाल:500 च्या बनावट नोटांत 14% वाढ; फसवणुकीत लोकांनी 30 हजार कोटी गमावले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मे । देशातील सर्वात जास्त मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेने मोठा गौप्यस्फोट मंगळवारी केला. मंगळवारी प्रसृत केलेल्या वार्षिक अहवालानुसार सन 2021-22 मध्ये 500 च्या 79,669 बनावट नोटा जप्त केल्या होत्या. सन 2022-23 मध्ये ही संख्या वाढून 91,110 झाली. म्हणजे ५०० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या एका वर्षात 14.4% वाढली. मार्च 2023 अखेरिस ५०० रुपयांच्या 5,16,338 नोटा चलनात होत्या. त्याचे मूल्य 25.81 कोटी रुपये अाहे. 2022-23 मध्ये एकूण 2.25 लाख बनावट नोटा जप्त केल्या. त्याचे मूल्य 7.9 कोटी रुपये आहे. सन 2016-17 च्या नोटबंदीवेळी नोटबंदी एकूण 7.62 लाख बनावट नोटा (मूल्य 43.29 कोटी रु.) जप्त झाले होत्या.त्यात 500 रु. च्या बनावट नोटा 3.17 लाख (मूल्य 15.87 कोटी रु.) होते.

आयटी उद्योगाला फटका….
2022-23 मध्ये सॉफ्टवेअर सेवा क्षेत्राची 109 अब्ज डॉलरवरून 11.10% घटून 96.9 अब्ज डॉलरवर घसरली. सॉफ्टवेअर सेवा क्षेत्राच्या निर्यातीत अनेक वर्षांनंतर घट झाली आहे.

सुखद संकेत : भारत वेगावर स्वार, विकास दर ६.५% राहणार
रिझर्व्ह बँकेने अहवालात म्हटले आहे की, सन 2022-23 मध्ये देशाचा विकास दर 7.0% होता. अर्थगती 2023-24 मध्येही कायम राहील. यंदाच्या आर्थिक वर्षात विकास दर 6.5% राहील असा अंदाज वर्तवला आहे. आगामी काळात खाद्यपदार्थांची महागाई नियंत्रणात राहील. सेवा क्षेत्रात निर्यात वाढ तसेच आयात वस्तूंच्या किमती घटल्याने वित्तीय तूट कमी राहील. जागतिक बाजारातील पुरवठ्यात भारताचा वाटाही वाढेल. परदेशी गुंतवणूकदारांसाठी अनुकूल परिस्थिती राहील. त्यामुळे परदेशी गुंतवणूकही वाढणार आहे.तथापि ,जागतिक अस्थितरता पाहता परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीत (एफपीआय) अस्थैर्य कायम राहण्याची शक्यता आहे.

1.36 लाख कोटी नोटा व्यवहारात, 2,086 लाख कोटी डिजिटल पेमेंट
देशात 2022-23 मध्ये एकूण 1.36 लाख कोटी (मूल्य 33.48 लाख कोटी रुपये) चलनी नोटा व्यवहारात होत्या. 2021-22 मध्ये 1.30 लाख कोटी (मूल्य 31.05 लाख कोटी रुपये) होत्या.

दूसरीकडे 2022-23 मध्ये एकूण 2,086 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले. 2021-22 मध्ये हे व्यवहार 1,744 लाख कोटींचे होते. म्हणजे डिजिटल व्यवहारात वार्षिक 19.61% वाढ. क्रेडिट कार्डपेक्षा 47% जास्त तर , डेबिट कार्ड व्यवहारापेक्षा 1.3% कमी झाले.

फसवणूक वाढली, रक्कम घटली :
2022-23 मध्ये 13,530 फसवणुक प्रकरणे. लोकांनी 30,252 कोटी रुपये गमावले. २021-22 मध्ये 9,097 प्रकरणे. 59,819 कोटी रुपयांना गंडा.

व्यापारातील तूट वाढली
2022-23 मध्ये एकूण निर्यात 340.32 अब्ज डॉलर होती. एकूण आयात 554 अब्ज डॉलर झाली होती. यामुळे व्यापारातील तूट एकूण 214 अब्ज डॉलर गेली आहे. 2021-22 मध्ये ही 189.45 अब्ज डॉलर होती. म्हणजे एक वर्षात सुमारे या तुटीमध्ये 13% वाढ झाली.

परकीय गुंतवणुकीत 21% घट
2022-23 मध्ये एकूण थेट परकीय गुंतवणूकीत (एफडी) 21% घट होऊन 3.78 लाख कोटी रुपये झाली. 2021-22 मध्ये 4.83 लाख कोटी रुपये झाली होती. सर्वाधिक 17.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक सिंगापूर येथून झाली. 6.1 अब्ज डाॅलर माॅरिशसमधून झाली.

महत्त्वाच्या क्षेत्रांत घट
रिझर्व्ह बँकेनेनुसार , जागतिक आर्थिक परिस्थितीचे आव्हान कायम असेल. तथापि, देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही.

देशात महागाई दर 2022-23 मध्ये 6.7% होता. वार्षिक तुलनेत 1.15% जास्त होती. 2022 पासून आतापर्यंत व्याजदरात 2.5% वाढ केली आहे. विद्यमान दरानुसार जीडीपीच्या तुलनेत देशांतर्गत गंुतवणूक 31.4% होती. 2021-22 मध्ये 27.9% होती. हॉटेल क्षेत्रात वृद्धी 14.2%, रिअल इस्टेट मध्ये 6.9%, बांधकाम क्षेत्रातील वृद्ध 9.1% राहिली. खनिज क्षेत्रातील वृद्धी 10.5% घटून 1.7%, उत्पादन क्षेत्रात हा दर 11.1% घटून 0.6% राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link