महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – मराठवाडा विशेष प्रतिनिधी: संजीवकुमार गायकवाड- परळी:राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे रोजी जयंती व सहा जून शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त राष्ट्रीय कर्तव्या साठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटक म्हणून मराठा सेवा संघाचे तामिळनाडू पांडुचेरी अंदमान निकोबार चे प्रभारी *शिवश्री प्रा. एम एल देशमुख सर* तर अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे परळी तालुका अध्यक्ष *शिवश्री ईश्वर जिजा सोनवणे* हे राहणार आहेत.
तरी परळी तालुक्यातील तरुणांनी या भव्य रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य व समाजकार्य साठी आपले योगदान द्यावे.असे आवाहन संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष *शिवश्री देवराव लुगडे महाराज* यांनी केले आहे. आज जगा सोबतच आपल्या भारतावरही करोनाचे महाभयंकर संकट ओढवले आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहेत. आज या महाभयंकर परिस्थितीचा विचार करता आणि रक्ताचा तुटवडा पाहता राज्यभर संभाजी ब्रिगेडच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्या परळी शहरात भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे सदरील भव्य रक्तदान *शिबिराचा कार्यक्रम सुज्वल मंगल कार्यालय जलालपूर रोड* *येथे आज दिनांक 10 जून 2020 वार बुधवार रोजी सकाळी 09.30 ते 01.30 या* वेळेत करण्यात येत आहे सदरीलभव्य रक्तदान शिबिराचेआयोजक मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड ,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद ,नामदेव तुकाराम वारकरी परिषद, संगीतसूर्य केशवराव भोसले संस्कृतीक कक्ष , कृषी परिषद महाराष्ट्र,मराठा उद्योजक कक्ष , सहकार कक्ष, मराठा वधू-वर सूचक, कक्षयासह मराठा सेवा संघाचे 33 कक्ष यांनी केले आहे.