दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार ; दुपारी १ वाजता ‘या’ संकेतस्थळांवर पाहाता येणार गुण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जून । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून ) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठीच्या लिंक :
१. mahresult.nic.in
२. https://ssc.mahresults.org.in
३. http://sscresult.mkcl.org

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *