या योजनांमध्ये १० लाखांच्या गुंतवणुकीवर उत्पन्नाचा दाखला बंधनकारक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जून । अल्पबचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या अल्पबचत योजनेत १० लाख किंवा त्याहून अधिक गुंतवणूक केल्यास तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादासाठी होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा टपाल विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या काही वर्गातील गुंतवणूकदारांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक असल्याचे, पोस्ट विभागाने सांगितले आहे.

पोस्ट विभागाने आपल्या अधिकाऱ्यांना काही विशिष्ट श्रेणीतील लहान बचत योजनांच्या गुंतवणूकदारांकडून उत्पन्नाचा पुरावा गोळा करण्याचे निर्देश दिले असून जर तुम्ही उत्पन्नाचा पुरावा दिला नाही तर तुम्हाला १० लाख किंवा त्याहून अधिक रकमेची गुंतवणूक करता येणार नाही.

टपाल विभागाची सूचना
पोस्ट विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये गुंतवणूकदारांसाठी केवायसीच्या तरतुदीही कडक करण्यात आल्या आहेत. केवायसीच्या नवीन तरतुदींमध्ये पोस्ट विभागाने गुंतवणुकीच्या जोखमीच्या आधारावर गुंतवणूकदारांना तीन श्रेणींमध्ये विभागले आहे. अशा स्थितीत आता गुंतवणूकदारांना पॅन कार्ड आणि आधार क्रमांक तसेच उत्पन्नाचा स्रोत देणे अनिवार्य असेल.

जोखमीनुसार ग्राहकांचे वर्गीकरण कसे होईल?
ज्या ग्राहकांच्या सर्व खात्यांमध्ये एकूण ठेवी रु. ५०,००० पेक्षा जास्त नाहीत त्यांना कमी जोखीम श्रेणीत ठेवण्यात येईल. तर ज्या ग्राहकांच्या सर्व खात्यांमध्ये एकूण शिल्लक रु. ५०,००० पेक्षा जास्त पण रु. १० लाखांपेक्षा कमी आहे त्यांना मध्यम जोखीम श्रेणीत टाकले जाईल आणि ज्या ग्राहकांची सर्व खात्यांमध्ये एकूण शिल्लक रु. १० लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना उच्च जोखीम म्हणून वर्गीकृत केले जाईल.

प्रत्येक वेळी केवायसी अनिवार्य
दरम्यान, पोस्ट विभागाच्या अधिसूचनेनुसार गुंतवणूकदारांना त्यांच्या जोखीम श्रेणीनुसार काही अंतराने पुन्हा KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. उच्च जोखमीच्या गुंतवणूकदारांना दर दोन वर्षांनी केवायसी, तर मध्यम जोखीम ५ वर्ष आणि कमी जोखमीच्या गुंतवणूकदारांना दर सात वर्षांनी KYC करावं लागेल.
मनी लाँड्रींग कायद्या अंतर्गत आधार कार्ड बँक खात्याला जोडणे बंधनकारकः RBI


कोणती कागदपत्रे जमा करावी लागणार
पोस्ट ऑफिस खात्याचे तपशील, जो निधीचा स्रोत दर्शवेल
मागील ३ आर्थिक वर्षांमध्ये भरलेले उत्पन्न विवरण
उत्तराधिकार प्रमाणपत्र, इच्छापत्राची प्रत, विक्री करार
ओळखीचा पुरावा म्हणून आधार आणि पॅन कार्ड
तसेच पासपोर्ट आकाराचे दोन फोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *