महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जुन । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,९३० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७१,८९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,१५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८६३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८५० रुपये असेल.मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,८६३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,८५० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८६३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८६३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८५० रुपये आहे.