” इंडिक टेल्स” या संकेत स्थळावर व लेखकावर कायदेशीर रित्या कठोर कारवाई करावी…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ जून । ज्या माऊलीने स्त्रियांना शिक्षणाची दरवाजे खुली परिणामी चूल मूल पर्यन्त मर्यादीत असणारी स्री देशाच्या…पंतप्रधान व राष्ट्रपती सारख्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचली . स्री शिक्षणाला विरोध करणार्‍या मनुवादी वृत्तीच्या विचारसरणी च्या अन्यायकारक कृत्यांना न घाबरता जिने धाडसाने सामना केला, वेळ प्रसंगी दगड धोंडे शेनाचा मारा सहन केला व सर्वांच्या विरोधाला न डगमगता स्री शिक्षणाची धुरा सांभाळली आणि स्त्रियांना शिक्षणा अधिकार मिळवून दिला .

अशा थोर समाजसुधारक स्री शिक्षणाची जनक सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल….शरयू ट्रस्ट नावाच्या संस्थेने त्यांच्या ” इंडिक टेल्स” नावाचे संकेत स्थळावर अतीशय खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह लिखाण केले आहे…सावित्रीबाई फुले फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटिश सैनिकांना मुली पुरवण्याची सोय… ज्यामुळे सावित्रीमाईं फुले यांची बदनामी झाली आहे . अशा प्रकारचे लिखाण करणार्‍या ” इंडिकी टे ल्स” या संकेत स्थळावर व लेखकावर कायदेशीर रित्या कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड ,पुणे यांच्याकडे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, पिंपरी चिंचवड तर्फे निवेदन देवून करण्यात आली आले. सदर निवेदन देतांना उपस्थित पदाधिकारी व फुले अनुयायी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *