माघार:अजित पवारांबद्दल मी काल जे बोललो त्याचा खेद वाटतो- संजय राऊत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुन । अजित पवार यांच्याबद्दल मी काल जे काही बोललो आहे, त्याचा मला खेद वाटतो. मी असे बोलणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत खासदार संजय राऊत यांनी माघार घेतली. त्यामुळे ‘मविआ’ मध्ये शनिवारी दोन नेत्यात जुंपलेले शब्दयुद्ध थंड झाल्याचे दिसून येत आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझा आणि अजित पवार यांचा स्वभाव थोडा हॉट असल्याने आम्ही दोघे पटकन व्यक्त होतो. अजित पवारांबद्दल मी जे बोललो त्याचा मला खेद वाटतो. यापुढे मी ठरवलं संपूर्ण भूमीका ऐकल्याशिवाय मी त्याविषयावर बोलणार नाही. अजित पवार हे मविआतील अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. असे विधान राऊत यांनी केले. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

आंदोलन करणाऱ्यांनी आधी उत्तरे द्यावी
माझ्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना मला एकच सांगायचे आहे की, माझा विरोध हागद्दार आणि बेईमान या प्रवृतीविषयी. त्यावर त्यांचे काय मत आहे, ते त्यांनी स्पष्ट करावे. सावरकरांनी देखील देशाविरोधात काम करणाऱ्या गद्दाराविरोधात थुंकले होते. मग मी वीर सावरकरांचा आदर्श घेतला तर त्यात वाईट काय? मुळात गद्दारांची नावे आले की, माझी जिभ दाताखाली येते. हे अगदी स्पष्ट झाले आहे. गद्दारांना असे वाटते की, भविष्यात आम्हाला रस्त्यावर फिरणे अवघड होईल. म्हणून ते माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *