महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुन । चीनमधील एक मद्य कंपनी जिआंग जिआ ओबाईने दारू पिणार्या अविवाहित तरुणांसाठी खास ऑफर आणली आहे. ऑफर अशी आहे की, 1 लाख 11 हजार 171 रुपये भरायचे आणि कंपनी त्यानंतर आजीवन दारूचा पुरवठा करत राहील! पण, अर्थातच, यासाठी एक अटही आहे आणि ही अटच अधिक जाचक आहे.
ही ऑफर अलीबाबा कंपनीच्या टी-मॉल प्लॅटफॉर्मवर दिली गेली असून यात पैसे भरणार्या ग्राहकाचा पाच वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला आयुष्यभर दारू मिळत राहील. ही ऑफर फक्त 99 ग्राहकांसाठी असून लकी कस्टमरला प्रत्येक महिन्याला दारूचे 12 बॉक्स पाठवले जातील. प्रत्येक बॉक्समध्ये दारूच्या 12 बाटल्या असणार आहेत.
टी-मॉलने दिलेल्या माहितीनुसार, अलीबाबा डिस्काऊंट कूपनचा वापर करत यापेक्षाही कमी किमतीत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. अर्थात, या कंपनीने ही ऑफर जाहीर केली असली तरी अनेेकांना त्याच्या अंमलबजावणीबाबत साशंकता आहे. खरोखरच ही कंपनी आयुष्यभर मोफत मद्य देणार का, असा प्रश्न काही मद्यप्रेमींनी उपस्थित केला आहे. यावर कंपनीने आपण यासाठी सर्टिफिकेट देणार असल्याचे जाहीर केले आहे. काही युजरनी मात्र यानंतरही कंपनी कुठवर चालेल, असा प्रश्न केला आहे.