Gold-Silver Price on 5 June 2023: सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुन । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,५४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,५३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७१,९५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,०७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४९६ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५४० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,४९६ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,५४० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४९६ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४९६ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५४० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *