Hair Care Tips: केस गळतीने वैतागला आहात? एकदा फक्त अशाप्रकारे लंवग पाणी केसांना लावा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुन । स्त्री आणि पुरुष यांच्या सौंदर्याचा केस हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. केस गळायला लागणे ही मोठी समस्या ठरते. आजार, औषधे किंवा अनुवांशिकता अशी विविध कारणे केस गळण्याच्या मुळाशी असू शकतात.केस गळणे ही अनेकांची समस्या आहे. वाढते वय, मानसिक ताण, हार्मोन्सचे असंतुलन, पोषक तत्वांची कमतरता, हवेतील प्रदूषण, आणि इतर शारीरिक आजार ही केस गळतीची काही मुख्य कारणे आहेत. केस गळणे ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे; जूने केस गळतात आणि त्यांच्या जागेवर नवीन केस येतात. परंतू, जेंव्हा केस गळण्याचे प्रमाण जास्त असते किंवा केस गळण्याच्या प्रमाणात नवीन केस येत नाहीत, तेंव्हा ती एक समस्या होऊन बसते. अशा केस गळतीची परिणती बहुतेक वेळा टक्कल पडण्यामध्ये होते, ज्याला अँड्रोजेनेटिक अलोपेशिया असेही म्हणतात. कधी कधी आपण केस गळतीसाठी डॉक्टरांकडून औषधं घेतो, मात्र याच औषधांमुळे पुन्हा केस गळतीची समस्या उद्भवू शकते. कारण औषधं प्रत्येका सूट होतील असं नसतं. चला तर मग यावर एक घरगुती उपाय करुन बघू.

तुम्हाला माहित आहे का किचनमध्ये असे बरेच रोजच्या वापरातील पदार्थ असतात ज्याचा वापर आपण केसांच्या समस्येवर करू शकतो. मसाल्याचा पदार्थ म्हणून लवंग घराघरात असतेच. केसांसाठी लवंगाचे फायदे माहीत आहेत का? लवंगातील बुरशीनाशक पदार्थ आणि अँटीफंगल गुणांमुळे केसांना इन्फेक्शन होत नाही. म्हणूनच वैद्य सांगतात लवंग केसांना मुळांपासून निरोगी बनवते. तर चला जाणून घेऊया केसांच्या वाढीसाठी लवंगाचे पाणी कसे बनवावे.

लवंगाचे पाणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –
लवंग १०-१२
कढीपत्ता ८-१०
पाणी २ कप
लवंगाचे पाणी कसे बनवावे?
सर्वप्रथम लवंगाचे पाणी बनवण्यासाठी कढई घ्या.
नंतर त्यात २ कप पाणी घालून उकळावे.
त्यानंतर त्यात १०-१२ लवंगा आणि ८-१० कढीपत्ता घाला.
मग हे पाणी नीट उकळून घ्या.
यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी सोडावे.
मग ते थंड झाल्यावर तुम्ही ते एका भांड्यात फिल्टर करा.
आपण हे पाणी सुमारे २ आठवडा रेफ्रिजरेटरमध्ये देखील ठेवू शकता.

स्काल्प इन्फेक्शनपासून मुक्त होण्यासाठी लवंगाच्या तेलाने टाळूची मालिश करावी. त्यात अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत, त्यामुळे ते तुमची टाळू स्वच्छ करण्यास मदत करते. लवंग तेलामध्ये असलेले रासायनिक युजेनॉल देखील एक उत्कृष्ट जंतुनाशक आहे जे कोणत्याही पुरळ बरे करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *