महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ जून । महाराष्ट्र स्टेट बोरफडाचा दहावीचा निकाल काही दिवसांआधी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही अर्ज प्रक्रिया दोन विभागांमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये निकालाआधीच पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. तर अर्ज प्रक्रियेचा दुसरा टप्पा निकालांनंतर सुरु झाला आहे. मात्र आता अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
विद्याथ्यांना आता कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी इयत्ता अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया निकालाआधीच सूरू करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती या शिक्षण विभागात ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची माहिती जसं की त्यांचं नाव आणि इतर माहिती भरावी लागणार होती. तर निकालानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना आपले मार्क्स आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी भराव्या लागणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पुरवणी परीक्षांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया होणार सुरु
या प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानंतर महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यासाठी 08 ते 12 जून, अशी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी 19 जून रोजी जाहीर होणार आहे, असे शिक्षण संचालनालयाच्या वतीने कळवण्यात आलं आहे.
असा असेल प्रवेशाचा दुसरा टप्पा
संबंधित अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना जिथे त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा महाविद्यालयांची प्राधान्य यादी द्यावी लागेल. या प्राधान्य फॉर्ममध्ये किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांची नावे भरता येतील. विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे. तसंच ज्या शहरांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार आहे. त्या शहरांची वेगळी वेबसाईट देण्यात आली आहे.
पहिल्या भागाची राज्याची आकडेवारी
रजिस्टर्ड केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या – 2,20,046
लॉक्ड विद्यार्थ्यांची संख्या – 1,32,195
ऑटो ल्लॉक्ड विद्यार्थ्यांची संख्या – 60,456
गाईडेड व्हेरिफिकेशन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या – 47,954
अर्ज मागे घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या – 75