औरंगजेब, टिपू सुलतानाचे उद्दातीकरण कोण करतंय, यामागे कोण याच्या खोलात जावेच लागेल : देवेंद्र फडवणीस

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुन । एका विशिष्ट समाजातील लोक औरंगजेब व टिपू सुलतान यांचे उद्दातीकरण करत आहे. पण यामागे कोण आहे. याचा शोध घ्यावा लागेल. विशेष म्हणजे काही नेते बोलतात. त्यानंतरच विविध जिल्ह्यांमध्ये उद्दातीकरण केले जाते. यामागे नेमके कोण आहे, याच्या खोलात जावेच लागेल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राज्यातील दंगली किंवा जातीतील तेढ निर्माण होण्यामागे राज्यातील सत्ताधारी जबाबदार आहेत, असा घणाघात शरद पवारांनी केले. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो- फडणवीस

औरंगजेबाचे उद्दातीकरण खपवून घेतले जाणार नाही, हे चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, औरंगजेब कोणाला जवळ वाटतो, हे सर्वांना माहित आहे, याची देखील चौकशी केली पाहिजे, असा इशारा देवेंद्र फडवीसांनी केला.

पवार बोलतात, नेमके त्याच्या उलटे होतेय
देशात मोदीविरोधी ट्रेंड आहे, असा आरोप शरद पवारांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पवार साहेब जे बोलतात, नेमकं त्याच्या उलटे होते. त्यामुळे त्यावर लक्ष देण्याची गरज नाही. तर 2014, 2019 मध्ये देखील असेच वाक्य पवार यांचे होते. त्यामुळे निवडणूका आल्या की, ते असे वाक्य बोलणार. परंतू लोक मोदींना निवडणूका जिंकत आहेत, असेही मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *