Fridge Jugad : जुना फ्रीजसुद्धा देईल नवीन सारखा थंडावा देईल, खर्चही होईल कमी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुन । फ्रीज, कूलर किंवा एसी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू थोड्या जुन्या झाल्या की त्यातील कूलिंग पावर कमी होऊ लागते. जेव्हा असे होते तेव्हा बरेच लोक नवीन फ्रीज खरेदी करतात. मात्र जुन्या फ्रीजची कुलिंग पावर वाढवण्यासाठी एक हटके ट्रिक तुम्ही वापरु शकता.तुमचा जुना फ्रिज चांगली कूलिंग देत नसेल, तर तुम्ही ती 200 रुपयांपेक्षा कमी खर्चात घरी बसून ही समस्या सोडवू शकता. ते कसं याविषयी पाहु या.

TEC1-12706 थर्मोइलेक्ट्रिक पेल्टियर कूलर मॉड्यूल या डिव्हाइसद्वारे तुम्ही तुमच्या फ्रिजची कुलिंग पावर वाढवू शकता. तुम्ही हे ऑफलाइन किंवा ऑनलाइन दोन्ही खरेदी करू शकता.हे उपकरण बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे की ते थंड आणि गरम अशा दोन्ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये काम करते.
या उपकरणाची एक बाजू गरम करण्यासाठी वापरली जाते, तर दुसरी बाजू थंड करण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच तुम्ही हे उपकरण फ्रीजशीही जोडू शकता. त्याची खास गोष्ट म्हणजे हे उपकरण तुमची वीज वाचवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे.हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे लहान उष्णता किंवा शीतलक पंप म्हणून कार्य करते. यामध्ये डीसी मोटरचा वापर करण्यात आला आहे. त्याच्या मॉड्यूलच्या एका बाजूने गरम हवा पास होते तर थंड हवा दुसरऱ्या बाजूने जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *