पालखी सोहळ्यातील सुविधांबाबत महापालिकेचा हलगर्जीपणा, आयुक्तांवर हक्कभंगाची कारवाई व्हावी

Spread the love

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

पिंपरीः
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी दिनांक 11 जून रोजी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत असून, त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी पालखी मार्गावर वाहतूक कोंडी तसेच इतर कारणास्तव सुख सुविधा उपलब्ध होण्यासाठी आढावा बैठक घेऊन अद्याप पाहणी केलेली नाही. महापालिका आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे या वर्षी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना वारीमध्ये असुविधांचा सामना करावा लागणार आहे. चालती फिरती शौचालये, तसेच वारी मार्गाची अस्वच्छता, मधुकर पवळे उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे तसेच या मार्गावरील निगडी येथे सुरु असलेले उड्डाण पुलाचे काम परिणाणी या वर्षी वारकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

काळभोर यांनी मुख्यमंत्री कार्यालयास ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, भक्ती-शक्ती उड्डाण पूल व मधुकर पवळे उड्डाण पूल येथील भुयारी मार्गाचे काम संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी निगडी येथील नागरिकांना सुरू करण्यात यावा म्हणून मागणी करण्यात आली होती त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी अद्याप दखल घेतली नाही. रस्ता ओलांडून जाण्यासाठी येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे. दीड किलोमीटर वळसा घालून रस्ता ओलांडून जावे लागत आहे तर दुसरीकडे संत तुकाराम महाराज पालखी निगडी भक्ती शक्ती मार्गे निगडी मुंबई पुणे महामार्गावर निगडी गावठाण येथील मारुती मंदिर या ठिकाणी थांबविण्यात येत असून, निगडी गावठाण मारुती मंदिर समोरील रस्ता अरुंद असल्याने वारकरी बांधवांना जाण्यासाठी येण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. भुयारी मार्ग काम सुरू असलेल्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर लोखंडी पत्रे मारून वॉल कंपाऊंड करण्यात आले असून, त्या ठिकाणी भुयारी मार्ग काम सुरू आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून रस्ता ओलांडून जाण्यासाठी येण्यासाठी दोन नागरिकांना जीव गमवावा लागला असून एक ९ वर्षांची मुलगी मरण पावली आहे.

त्या भुयारी मार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता ओलांडून जाण्याच्या प्रयत्न करत असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी निगडी येथील भुयारी मार्ग नागरिकांना सुरू करण्यात यावा, म्हणून त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी दुर्लक्ष केल्यामुळे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने निगडी येथील भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब दखल घेऊन आगामी वारी सोहळ्यास सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनास योग्य सूचना देण्यात याव्यात. निगडी येथील भुयारी मार्ग नागरिकांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी भुयारी मार्ग सुरू करण्यात यावा. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांच्या विरोधात हक्कभंग कारवाई करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *