महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुन । सोने-चांदीने (Gold Silver Price) खरेदीदारांसाठी आनंद वार्ता आणली आहे. जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील तर सध्या चांगला मुहूर्त आहे. सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. भावात चढउतार असला तरी गेल्या दोन महिन्यांपासून भावाच्या आघाडीवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. किंमतीत वाढ न झाल्याने ग्राहकांची सराफा बाजारात वर्दळ वाढली आहे. भाव थेट 60,000 रुपयांच्या घरात आल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
असा झाला बदल
ibjaratesनुसार, या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोने 68 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 60028 रुपयांवर पोहचले. तर मंगळवारी सोन्याने 495 रुपयांची उसळी घेतली होती. सोन्याचा भाव 60096 रुपये होता. तर बुधवारी चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. चांदी 80 रुपयांनी स्वस्त होऊन 71824 रुपये प्रति किलोवर बंद झाली. मंगळवारी चांदी 442 रुपयांनी महाग होऊन 71904 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
बुधवारी 24 कॅरेट सोने स्वस्त होऊन 60028 रुपये, 23 कॅरेट 59788 रुपये, 22 कॅरेट सोने 54986 रुपये, 18 कॅरेट 45021 रुपये आणि 14 कॅरेट सोने 35116 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.