महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुन । केरळमध्ये मान्सून उशिराने दाखल झाला असून आता राज्यात पाऊस कधी हजेरी लावणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. वादळी वाऱ्यांमुळे मान्सून केरळमध्ये यंदा उशिराने दाखल झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रालाही आणखी प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. हवामान विभागानुसार, मान्सून १८ जूनपर्यंत दक्षिणेतून महाराष्ट्रात दाखल होईल, असे सांगण्यात येत आहे.(Weather Update Monsoon in Kerala Maharashtra Rain June 18 Biparjoy IMD)
मान्सून साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो. पण, आता केरळमध्ये पाऊस उशिरा आल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे. Weather Updates
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी राज्यातील पावसाबाबत माहिती दिली आहे. आयएमडी प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस.जी. कांबळे यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात 10 जून आणि मुंबईत 11 जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे.Weather Updates
मान्सून सध्या केरळमध्ये पोहोचला असून त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवलं जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल.