महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुन । Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ हे फोन अनुकमे 15 आणि 16 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. मात्र, फ्लिपकार्टवर तुम्ही आताच हा फोन प्रीऑर्डर करु शकणार आहात. यासोबतच, या फोनवर तुम्हाला मोठा डिस्काउंटही देण्यात येत आहे.
किती आहे किंमत?
Realme 11 Pro या फोनचं बेस मॉडेल 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतं. याची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 24,999 रुपये आहे. Realme 11 Pro च्या टॉप व्हेरियंटमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आलंय. याची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Realme 11 Pro+ या फोनच्या बेस मॉडेलची किंमत 27,999 रुपये असणार आहे. यामध्ये 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आलं आहे. तर याच्या टॉप मॉडेलमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आलंय. याची किंमत 29,999 रुपये आहे.