मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर, सहकुटुंब घेतलं वैष्णो देवीचं दर्शन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुन । राज्यात गेल्यावर्षी अभूतपूर्व अशी बंडाळी निर्माण झाली होती. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली. या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर गेल्याचं सांगितलं जात आहे. गुरूवारी ( ८ जून ) एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब वैष्णो देवीचं दर्शन घेतलं.

गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुरूवारी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले. तेथून विशेष हेलिकॉप्टरच्या मदतीने जम्मूतून सीधे पंछी हेलिपॅड येथे ३ वाजता पोहचले. येथे वैष्णो देवी मंदिर समितीचे अधिकारी नवनीत सिंह, अजय सलान आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ३.४५ वाजता ते वैष्णो देवीच्या मंदिरात पोहाचले. येथे एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब वैष्णव देवीचं दर्शन घेतलं.

वैष्णो देवी मंदिर समितीने पवित्र चुनरी भेट देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला. सायंकाळी ५.३० वाजता वैष्णो देवी भवन येथून हेलिपॅडवर पोहचत विशेष हेलिकॉप्टच्या मदतीने जम्मूला रवाना झाले. ‘अमर उजाला’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *