Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
राज्यात पुढचे पाच दिवस उष्णता, दमट वातावरण; 16 जूननंतर मान्सून गाेवा व सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करण्याची शक्यता - Maharashtra 24

राज्यात पुढचे पाच दिवस उष्णता, दमट वातावरण; 16 जूननंतर मान्सून गाेवा व सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुन । राज्यात शुक्रवारी उन्हाची तीव्रता वाढलेली हाेती. त्याचप्रमाणे अार्द्रता वाढल्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा अाणि विदर्भात ढगाळ वातावरण हाेते. विदर्भ अाणि काेकणातही १५ जूनपर्यंत उष्णता व दमटपणा वाढलेला राहील. १६ जूननंतर मान्सून गाेवा व त्यापाठाेपाठ सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला.

‘बिपाेरजाॅय’ चक्रीवादळाच्या बाह्य परिघातून निघालेल्या वाऱ्यांमुळे नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसांत ताशी २५ ते ३० किलाेमीटर वेगाने वारे वाहतील, अशी माहिती हवामान विभागातर्फे देण्यात अाली.

उच्च परिघात आर्द्रता
अति उष्णता म्हणजे अति आर्द्रता हे हवामान शास्त्रीय सूत्र आहे. सूर्यकिरणांमुळे जमिनीवर निर्माण झालेल्या उष्णतेमुळे दुपारच्या कमाल तापमानात वाढ झाली अाहे. त्यात ढग कमी असल्याने सूर्यकिरणांची तीव्रता जास्त अाहे. परिणामी उच्च परिघात अति आर्द्रता अाहे. संपूर्ण राज्यात पुढील ५ दिवस नागरिकांना अशाच वातावरणाचा सामना करावा लागेल, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *