महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुन । सोने-चांदीने (Gold Silver Rate Today) शुक्रवारी जोरदार मुसंडी मारली. गेल्या एक महिन्यापासून या मौल्यवान धातूंनी नरमाईचे धोरण आखले होते. जून महिन्यातच सोन्यात हजार रुपयांहून अधिकची पडझड झाली. तर चांदीच्या किंमती पण मोठ्या प्रमाणात वाढल्या नाहीत. मे महिन्यात पण सोने-चांदीला कोणताही नवीन रेकॉर्ड नावावर नोंदविता आला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात मात्र या दोन्ही धातूंनी ग्राहकांना धक्क्यावर धक्के दिले होते. शुक्रवारी सकाळच्या सत्रात घसरणीचा सूर असताना दुपारनंतर नूर पलटला. सोन्यात 400 रुपयांची वाढ झाली तर चांदीने 1100 रुपयांची चढाई केली. शनिवारी, 10 जून रोजी सकाळच्या सत्रात घसरणीचा सूर आहे.
पाचव्या दिवशी काय स्थिती
या आठवड्याच्या पाचव्या दिवशी सोने 389 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारले.
सोने 59,976 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. इतर दिवशी सोन्यात पडझडीचे सत्र होते.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
शुक्रवारी 24 कॅरेट सोने 59976 रुपये, 23 कॅरेट 59736 रुपये, 22 कॅरेट सोने 54938 रुपये, 18 कॅरेट 44982 रुपये आणि 14 कॅरेट सोने 35086 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.