विमान अपघातानंतर 40 दिवसांनी अ‍ॅमेझॉनच्या जंगलातून 4 मुलांची सुखरूप सुटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुन । 1 मे रोजी अ‍ॅमेझॉनच्या जंगलात सिंगल इंजिन असलेले विमान कोसळले. या विमानात 6 प्रवाशांसह 1 पायलट उपस्थित होता. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. यानंतर घटनेच्या 40 दिवसांनंतर अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलातून 4 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. अ‍ॅमेझॉनच्या जंगलातून सुटका करण्यात आलेल्या लहान मुलांमध्ये एका नवजात बालकाचा समावेश आहे. तर बाकीच्या तिघांचे वय 13, 9 आणि 4 असे आहे.

जंगलातून सुटका करण्यात आलेल्या मुलांची अवस्था अत्यंत वाईट होती. त्या लोकांच्या शरीरात पाण्याची कमतरता होती, शरीराला कीटकांचा दंश झाला होता. “बचाव पथकाने अ‍ॅमेझॉनच्या जंगलातून चार मुलांची सुटका केली आहे. ही सर्व मुले 40 दिवसांपूर्वी झालेल्या विमान अपघातात बचावली होती.” अशी माहिती कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी शुक्रवारी दिली.

अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सांगितले की, या मुलांना शोधण्यासाठी गेल्या 40 दिवसांपासून बचाव कार्य सुरू होते. यासाठी आमच्या सरकारने खूप मेहनत घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष पेट्रो यांनी क्युबातून बोगोटा येथे परतताना पत्रकारांना सांगितले की, मुलांना जंगलातून वाचवल्यानंतर आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सेसना सिंगल-इंजिन प्रोपेलर विमान अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने 1 मे रोजी हा अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *