महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुन । टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमावला आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना 209 धावांनी जिंकला. गेल्या 10 वर्षात, भारतीय संघाने 8 ICC स्पर्धांमध्ये बाद फेरी गाठली, चार फायनल खेळल्या, पण त्यांना एकही विजेतेपद जिंकता आले नाही. कोणत्या कारणांमुळे सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी भारताच्या हातात येऊ शकली नाही.
1. IPL मुळे खेळाडु थकले होते , नंतर तयारी करायला वेळ नव्हता.
2. दुखापती मुळे चार सर्वोत्तम खेळाडू खेळले नाहीत.
3. कांगारूंची तयारी भारतीयांपेक्षा चांगली
४. संघ निवड चुका – जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अश्विनला घेतले नाही,
५. गोलंदाजी दिशाहीन .