महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुन । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,८२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,८१० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७३,९७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,९७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ५४,८३५ प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,८२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८२६ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,८३५ रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८३५ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८३५ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८२० रुपये आहे.