शरद पवार यांना धमकी देणारा आयटी इंजिनिअर अटकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सागर बर्वे (३४) याला पुण्यातून अटक करण्यात आली. तो आयटी इंजिनिअर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. न्यायालयाने बर्वेला १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दोन दिवसांपूर्वी शरद पवारांना ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेसबुक पेजवरुन ‘तुमचा लवकरच दाभोलकर करू’ अशी धमकी देण्यात आली होती. तर अमरावती येथील सौरभ पिंपळकर या भाजप कार्यकर्त्याच्या ट्विटवरून पवारांची औरंगजेबाशी तुलना करुन आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे त्याची तक्रार केली होती. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी तातडीने तपास सुरु केला होता. तांत्रिक तपास केल्यानंतर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाचे फेसबुक पेज पुण्यातील इंजिनिअर सागर बर्वे हा चालवत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, त्याच दिवशी खासदार संजय राऊत यांनाही फोनवरुन धमकी देण्यात आली होती. त्याप्रकरणी दोघांना त्याच दिवशी अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *