महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुन । पुण्यातील मार्केटयार्डात मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत हॉटेलमधील ३ कामगार होरपळले असून यातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. (Pune News Marketyard Hotel Fire breaks out midnight 2 workers death one injured)
पुण्यात मध्यराञी एक वाजण्याच्या आसपास मार्केटयार्ड, गेट नंबर येथील एका हॉटेलला आग लागली. या घटनेत आतमध्ये पोटमाळ्यावर झोपलेल्या 3 कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर एकावर उपचार सुरु आहे.
आगीची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.
मुन्ना राठोड आणि संदीप अशी मृत कामगारांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरातील रेवण हॉटेल आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास या हॉटेलला अचानक आग लागली.