Weather Update : राज्यातील या जिल्ह्यांत पुढील 2 दिवस पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुन । पुढील 2-3 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान खात्याने विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.नशिक,रत्नागिरी, रायगड, पालघर, छ. संभाजीनगर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील इतर शहरांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, 15 जून रोजी चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे यासोबतच राज्यातील इतर भागांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *