इंधन दरवाढ सुरुच; पेट्रोलियम कंपन्यांची कमाई जोरात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – मुंबई – मुंबईतच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ८०.९८ रुपये झाला. त्यात ५८ पैशांच वाढ झाली. डिझेलच्या भावात देखील ५५ पैशांची वाढ झाली आहे. डिझेलच्या किमती ७० रुपयांवर गेल्या आहेत. डिझेलचा आजचा भाव ७०.९२ रुपये आहे. त्यात ५७ पैशांची वाढ झाली. दिल्लीत पेट्रोल ७४ रुपयांवर गेले आहे. त्यात ६० पैशांची वाढ झाली. डिझेल ७२.२२ रुपये झाले आहे. त्यात ६० पैशांची वाढ झाली. बुधवारी तो ७१.६२ रुपये होता.

कोलकात्यात पेट्रोल ७५.९४ रुपये झाले आहे. बुधवारी ते ७५.३६ रुपये होते. डिझेल ६८.१७ रुपयांवर गेले आहे. काल डिझेलचा भाव ६७.६३ रुपये होता.चेन्नईत आज पेट्रोल दर ७७.९६ रुपयांवर गेला आहे. चेन्नईत डिझेल ४९ पैशांनी महागले. आज चेन्नईतील डिझेलचा दर ७०.६४ वर गेला आहे.

तब्बल ८३ दिवसांनंतर रविवारी प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली होती. मागील दोन महिने कठोर टाळेबंदीने रस्ते वाहतुकीवर निर्बंध होते. यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी घसरण झाली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उणे स्तर गाठला होता. त्यामुळे कमॉडिटी बाजारात खळबळ उडाली होती. तेलाची साठवणूक परवडत नसल्याने तेलाच्या किमती गडगडल्या होत्या. सध्या कच्च्या तेलाच्या किमती ४० डॉलरच्या आसपास आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि पेट्रोल विक्रेत्यांची गेल्या महिन्यात बैठक पार पडली. यात जूनपासून दैनंदिन दर आढावा घेण्याचे मान्य करण्यात आले. केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेससह एक्साइज ड्युटी अनुक्रमे १० आणि १३ रुपये प्रति लिटर वाढवली, तर पेट्रोल-डिझेलवर रोड सेस ८ रुपये आणि अबकारी कर दोन व पाच रुपयांनी वाढवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *