करोना रोखण्याकरिता ‘आरोग्य सेतू’ अँप प्रभावी ठरू शकतेः राजेश टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – मुंबई – राज्यातील काही भागातील करोनारुग्णांचा मृत्यू दर हा राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ हे अँप महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले.

करोना संसर्ग रोखण्याकरिता कॉण्टॅक्ट ट्रेसिंगसाठी, हॉटस्पॉट ओळखण्यासाठी या अँप चा वापर कसा प्रभावी होऊ शकतो यासाठी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच राज्यातील करोना हॉटस्पॉट बनलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

राज्यात सध्या जे प्रतिबंधित विभाग आहेत त्यात, अजून वाढ होऊ नये आहे. त्यातच प्रभावीपणे क्लस्टर कंटेनमेंट कृतीयोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी हे अँप महत्त्वाचे काम करू शकते, असे टोपे म्हणाले. या अँप बाबत अधिक जनजागृतीची गरज असल्याचे सांगतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी ही मोहीम हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या अँप द्वारे सामान्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यभरात मालेगाव, जळगाव, अकोला दौरे केले त्यात काही भागांचा मृत्यू दर हा राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. शेवटच्या क्षणाला उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. ते कमी करण्यासाठी आणि लवकर निदानासाठी आरोग्य सेतू अँप महत्वाची भूमिका बजावू शकतो. सामान्य नागरिकांनी हे अँप डाऊनलोड केले तर त्याबाबत प्रशासनाला आणि आरोग्य अधिकाऱ्यांना वेळीच माहिती मिळू शकेल. लोकांनाही स्वताच्या आरोग्याची काळजी घेता येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव, संचालक डॉ. साधना तायडे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अकोला, बुलढाणा, नागपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *