पतंजलीकडून करोनावर वनौषधीपासून लस, औषधाच्या चाचण्या सुरु

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – अजय सिंग – नवीदिल्ली – पतंजलीचे संस्थापक बाबा रामेदव यांनी करोना व्हायरसवर आपल्याकडे उपचार उपलब्ध असल्याचा दावा केला होता. माझी औषधे १०० टक्के परिमाणकार ठरतील असेही त्यांनी म्हटले होते.

गिलोय आणि अश्वगंधा करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये परिणामकारक असल्याचे बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे. करोना व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यानंतर तो संपूर्ण शरीराची रचना बिघडवून टाकतो. या व्हायरसचा गुणाकार होत जातो व जास्तीत जास्त पेशींवर परिणाम होतो. इन्फेक्शनची साखळी मोडण्यामध्ये गिलोय १०० टक्के परिणामकारक आहे असे बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे.

पतंजलीने बनवलेल्या औषधाच्या चाचण्या सुरु आहेत. लवकरच त्याचे रिझल्ट समोर येतील. पतंजलीचे संशोधन पूर्ण झाले आहे आणि लवकरच या संशोधनाचा निष्कर्ष जगासमोर मांडला जाईल. पतंजलीकडून करोना व्हायरसवर वनौषधीपासून लस बनवण्यात येत आहे. आयुर्वेदामध्ये माणसांसाठी धोकादायक ठरणाऱ्या करोना व्हायरसवर उपचार करण्याची ताकत आहे. मूळपासून हा आजार बरा करता येऊ शकतो असे बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *