Raj Thackeray Birthday: राज ठाकरेंच क्रिकेटर होण्याचं स्वप्न भंगलं ते बाळासाहेबांमुळं…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुन ।महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. राज ठाकरे त्यांची लहानपणाची सवयी, आरोप-प्रत्यारोप, क्रिकेट आणि त्यांच बोलणं यावरून सारखे चर्चेत असतात. राज ठाकरेंना लहानपणी क्रिकेट खूप आवडत होते. पण एका घातपातामुळे त्यांना क्रिकेट सोडावं लागलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र क्रिकेट खेळताना फोटो पण आहेत. गल्ली क्रिकेटमध्ये राज ठाकरे अंडर आर्म बॉलिंग करण्यासाठी प्रसिद्ध होते. क्रिकेट खेळण्यासाठी त्यांना कोच म्हणून अण्णा वैद्य यांच्याकडे पण पाठवण्यात आले.

नेटमध्ये प्रॅक्टिस करताना एकदा राज ठाकरे यांना वेगवान चेंडू थेट पायावर येऊन लागला. काही वेळातच त्याचा पाय सुजला होता. घरी आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे थोडी रागावले आणि त्यांना म्हणाले आता पायावर निभावलं हेच हाताला लागला असत तर? तुला चित्रकार व्हायचं आहे ना? मग त्यावर लक्ष केंद्रित कर. असं नको व्हायला की धड चित्रकार पण नाही, ना धड क्रिकेटर! बाळासाहेबांच्या या बोलणांवर त्यांनी क्रिकेटचा नाद सोडला. आणि व्यंगचित्रांकडे लक्ष केंद्रित केलं. या प्रसंगाचा उल्लेख लेखक धवल कुलकर्णी यांनी ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *